रत्नागिरी – श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून असंघटीत कामगारांची माहिती एका राष्ट्रीय डेटाबेसमध्ये साठविण्यासाठी ई-श्रम पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे.

यामध्ये सर्व क्षेत्रातील असंघटित कामगारांचा समावेश होत असून यामध्ये बांधकाम कामगार, घरेलू कामगार महिला, हातगाडीवाले, रिक्षाचालक, स्थलांतरीत कामगार, फळ/भाजी विक्रेता, मच्छिमार, वृत्तपत्र विक्रेता इत्यादी तीनशे व्यवसाय गटातील कामगारांचा समावेश करण्यात येणार आहे.

ई-श्रम पोर्टल नोंदणीसाठी कामगार 16 ते 59 वयोगटातील असावा. कामगार भविष्यनिर्वाह निधी व कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद तसेच आयकरदाता नसावा. नोंदणीसाठी आवश्यक आधारकार्ड, बँकपासबुक, आधारलिंक असलेला मोबाईल क्रमांक, वयाचा पुरावा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

तरी असंघटित क्षेत्रातील कामगारांनी नजीकच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जावून किंवा eSHRAM portal URL: eshram.gov.in या संकेतस्थळावर विनामूल्य आपले ई-श्रम कार्डची नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी टोल फ्री क्र. 18001374150 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त, रत्नागिरी यांनी केले आहे.