चिपळूण : डेरवण येथील भ.क.ल. वालावलकर रुग्णालय डेरवणतर्फे मोफत महाशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असणार्‍या नागरिकांसाठी दि. 1 ते 20 डिसेंबर या कालावधीत हे शिबिर होत आहे. या शिबिरात तपासणी केल्यानंतर डिसेंबर व जानेवारी महिन्यात शस्त्रक्रिया होणार आहेत. या अंतर्गत हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, अल्सर, प्रोटेस्ट ग्रंथी, मूळव्याध, मूतखडे, चरबीच्या गाठी, थॉयरॉईड, महिलांसाठी गर्भाशय शस्त्रक्रिया, नाक-कान-घसा शस्त्रक्रिया, नाकाचे हाड वाढणे, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, टॉन्सिल्स, मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे. शस्त्रक्रिया करण्याआधी कोव्हिड तपासणी आवश्यक असून या शिबिराचा लाभ घेण्यासाठी सचिन धुमाळ, संकेत जांभळे, संदीप पाटील यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.