नवी दिल्ली : भारतासाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटला रोखण्याच्या भारताच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. ओमिक्रॉनचे दोन रूग्ण भारतात सापडले आहेत.
ओमिक्रॉनचे हे दोन्ही रुग्ण कर्नाटक राज्यात आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबतची माहिती जाहीर केली आहे. माहि
साऊथ आफ्रिकेतून आलेले दोन रुग्ण कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटनं बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं कर्नाटक राज्यात खळबळ माजली आहे. 66 वर्षीय आणि 46 वर्षीय अशा दोन पुरुष प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची लागण झाली आहे.
काय आहे ओमिक्रॉन व्हेरिएंट?
डेल्टा व्हेरिएंटमध्ये 8 वेळा बदल झाल्याचं अभ्यासामध्ये आढळलं होतं. याचा अर्थ असा की, डेल्टा व्हेरिएंट आठ वेळा म्युटेट झाल्याची नोंद होती.
पण ओमिक्रॉनच्या बाबतीत हा आकडा मोठा आहे. यामध्ये विविध बदल झाले आहेत. यामधील म्युटेशनची फारशी माहिती अद्यापही उपलब्ध नाहीये, त्याचा अभ्यास सुरू आहे
सौम्य लक्ष्णं आहेत
या नव्या व्हेरीएंटमुळे घाबरून जाण्याचं काहीएक कारण नाहीये, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. जे रुग्ण सध्या आढळत आहेत त्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत.
सध्या सर्वांनी कोरोनाची योग्य प्रकारे काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य यंत्रणेने केलं आहे. मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंग या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, तज्ज्ञांनी म्हटलं आहे.