रत्नागिरी – जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक दिवसानंतर आज नव्या कोव्हिड बाधित रुग्णांचा आकडा 100 च्या खाली नोंदला गेला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची आजची संख्या शंभर असून त्यांचे प्रमाण 94.78 टक्के इतके आहे.
जिल्ह्यात कोव्हिड बाधितांची संख्या सातत्याने वाढत होती. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दैनंदिन स्वरूपात याचा आढावा घेण्यास सुरुवात केली व साधारणपणे दररोज एक ते दीड तास याबाबतीत सविस्तर आढावा घेण्याची कार्यवाही सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.
एका बाजूला तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सर्व तयारी केली जात असून दुसऱ्या बाजूला सध्या असणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत.
यासंदर्भात गठित टास्क फोर्स च्या माध्यमातून कुरूना बाधितांचे होणारे मृत्यू कमी करण्याचेही प्रयत्न जिल्ह्यात सातत्याने सुरू आहेत.
अधिकाधिक जणांनी स्वच्छेने याबाबत तपासणीसाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात लसीकरणाच्या कामालाही गती मिळाली असून मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचे काम जिल्ह्यात सध्या सुरू आहे.