खेड:- खेड शहरातील पूरग्रस्त भागातील श्री गौस खतीब , श्री अरिफ मुल्लाजी, श्री अनस पोत्रिक, श्री दादुभाई काद्री, श्री वाभ चौगुले सदर नागरिकांनी दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आ. योगेश कदम यांची भेट घेतली व घरपट्टी नुसार पंचनामे न करता रेशन कार्ड नुसार कुटुंब निहाय पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी केली. यावेळी त्वरित आ. योगेश कदम यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांच्याशी त्वरित संपर्क साधून त्यांच्याशी नागरिकांचा मागणी नुसार चर्चा करून निर्णय करून घेतला व खेड तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून रेशनकार्ड नुसार कुटुंब निहाय अन्नधान्य, भांडीकुंडी, गृहोपयोगी वस्तू यांची नुकसान भरपाई मिळणे करिता फेरपंचनामे करण्यात येणार आहेत.