राजापूर: रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडत असून आज सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास एकजण कोंढतर पूल पार करत असताना जोड रस्त्यावरून वाहून जाण्याची घटना घडली आहे. याबाबत राजापूर नगरपरिषदेचे कर्मचारी व प्रशासकीय यंत्रणा शोध घेत आहेत. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. रत्नागिरी जिल्ह्यात तुफानी पाऊस पडत असून नद्यांना पूर आलेले आहेत. राजापूर शहर व परिसरातील भागत पुराचे पाणी शिरले असून आज सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास कोंढतर पूल पार करत असताना एक जण बाजूच्या जोड रस्त्यावरून वाहून गेल्याची घटना घडली आहे. समोरच काही महिला होत्या, त्यांनी ते पाहिले आणि तात्काळ राजापूर नगरपरिषदेच्या कर्मचऱ्याशी संपर्क केला. आता त्याचा शोध घेणे सुरू आहे. एवढ्या पावसात कोण पूल पार करून कुठे जात होता याबाबत चर्चा सुरू आहे.