भास्कर जाधवांना विधानसभेच्या अध्यक्षपदाचे वेध लागल्याची चर्चा आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, विधानसभेच्या अध्यक्ष पदाबाबत आमच्या तिन्ही पक्षांचा निर्णय स्पष्ट आहे. विधानसभा अध्यक्ष पद हे काँग्रेसला गेलेले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरवील ती व्यक्ती अध्यक्ष होईल. काँग्रेस पक्ष दिल्या त्या व्यक्तीला आमच्या तिन्ही पक्षाची मान्यता असेल.”