रत्नागिरी : जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस विषयांकीत कायद्यातील तरतुदीनुसार सादर करावी, असे कळविण्यात आले आहे. विहित नमुना ई आर-१ मध्ये नियमितपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून त्यांना देण्यात आलेल्या युझर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉग ईन करून ऑनलाईन पध्दतीने सादर करून सहकार्य करावे. तिमाही अखेर संपणाऱ्या ई आर १ मधील माहिती सादर करण्यासाठी प्रत्येक तिमाही (मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर) अखरेच्या महिन्यामध्ये सादर करावी याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी. तिमाही विवरणपत्र विहीत मुदतीत सादर करून सहकार्य करावे. प्रत्येक आस्थापनांनी आपला तपशिल अद्ययावत करण्यात यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरीद्वारे करण्यात येत आहे. अधिक माहितीकरिता संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.