पावसाळी अधिवेशातील पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. इतकंच नाही तर अध्यक्षांच्या दालनात आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला होता. त्यानंतर अखेर जाधव यांना दोन सुरक्षारक्षक देण्यात आले आहेत. अधिवेशनात झालेल्या गोंधळानंतर महाविकास आघाडीनं जाधव यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय.