नवी दिल्ली केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ७ जुलैला होणार आहे. महाराषट्रातून नारायण राणे, हिना गावित यांच्या नावाची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळातील १७ ते २२ मंत्री ७ जुलैला शपथ घेतील. शपथविधी ७ जुलैला होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागणार आहे. एका आठवड्यापूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एकामागून एक बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये पंतप्रधानांनी मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेतला आहे.