राज्यात कोरोनाचे प्रमाण हळूहळू नियंत्रणात येत असेल तरी आज, रविवारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. काल, शनिवारी राज्यातील रिकव्हर रेट ९६ टक्के एवढा होता. पण आज त्यात घसरण होऊन ९५. ९१ टक्के एवढा झाला आहे. राज्यात २४ तासांत ९ हजार ३३६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १२४ जणांच्या मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ९८ हजार १७७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २३ हजार ३० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात १ लाख २३ हजार २२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात राज्यात ३ हजार ३७८ रुग्ण बरे होऊन घरी आजपर्यंत एकूण ५८ लाख ४८ हजार ६९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.९१ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी २५ लाख ४२ हजार ९४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख ९८ हजार १७७ (१४.३३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ३८ हजार ४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार १९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.