तवेरा गाडी क्रमांक MH 08 R 8295 मधून तौफिक रजाक मेमन वय-३२ वर्षे रा. हर्णे ता. दापोली जि. रत्नागिरी हा दि.०२/०७/२०२१ रोजी बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करत असल्याबाबतची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी 05 वाजता सुमारास सापळा रचून त्याला भरणे येथे पकडण्यात आले आहे. त्या गाडीमध्ये सुमारे ०३ लाख ४३ हजार रुपये किंमतीचा आरएमडी व विमल गुटखा असल्याचे तसेच सदरचा गुटखा हर्णे ता.दापोली येथे विक्री करीता घेऊन जात असल्याची माहिती सदर इसमाकडू मिळाली आहे. या प्रकरणी तौफिक मेमन आणि आश्रफ मेमन वय ४२ रा. मच्छी मार्केट रिक्षा स्टॅण्ड जवळ ता.खेड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकीरण काशीद, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे तपास पथक प्रमुख सपोनि सुजित गडदे, पोना/वीरेंद्र आंबेडे, पोशी/साजिद नदाफ, पोशी/अजय कडू, पोशी/संकेत गुरव यांच्या पथकाने केली.