गेले सात महिने केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन चालु असून केंद्र सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. नव्या कृषी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी दुरुस्ती विधेयक आणले पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी वर्षा निवासस्थानी भेट झाली. या भेटीच्या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न केला. त्यावर विकासकामांना गती देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.