राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पडताना पवारांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद स्पष्ट दिसत होता. मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वासही गेल्या काही दिवसांत चांगलाच वाढला आहे आणि काँग्रेसविषयी काय सांगावे…. आत्मविश्वासाच्या बाबतीत त्यांची चारही बोटे शुद्ध तुपात आहेत. महाराष्ट्राचं सरकार ५ वर्षे पूर्ण करणारच, असा पुनरुच्चार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून व्यक्त केला.