रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा रूग्ण संख्या वाढू लागली आहे. आज ५९० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५८५१६ वर पोहोचली आहे. आज ४२९ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ५०९८३ वर पोहोचली आहे. आज ६नव्या रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, अशी माहिती बुधवार (दि. २३)जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.