भारतात आलेली कोरोना महामारची दुसरी लाट देशवासियांची चिंता वाढवणारी ठरली. देशात आतापर्यत 2.83. कोटी जणांना कोरोनाची लागण झालेली असून, देशात 3.35 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोना विषाणूला उतरती कळा लागल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने केला आहे. भारतात आढळलेल्या ‘डेल्टा’ व्हेरिएंटच्या तीनपैकी केवळ एका स्ट्रेनची घातक असल्याचे सांगतले आहे.

या स्ट्रेनला थोपवण्याचे आव्हान भारतीय वैज्ञानिकांपुढे आहे. तर उर्वरित दोन स्ट्रेनचा धोका कमी झाला आहे, असे ‘डब्ल्यूएचओ’ने मंगळवारी जाहीर केले.

भारतात एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड थैमान घातले होते. या लाटेला ‘B.1.617’ नावाने ओळखला जाणारा कोरोनाचा ‘डेल्टा’ व्हेरिएंट जबाबदार आहे. ‘डब्ल्यूएचओ’ने गेल्या महिन्यात भारतातील ‘B.1.617’ व्हेरिएंटच्या तिन्ही स्ट्रेनला ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ म्हणून जाहीर केले होते.

दरम्यान, यावर भारत सरकारने आक्षेप घेतला होता. मात्र, आरोग्य संघटनेने मंगळवारी असे म्हटले, की आता B.1.617 व्हेरियंटमधील केवळ एकच प्रजाती हि चिंतेचा विषय आहे.