देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृत्यूच्या संख्येत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. मंगळवारी बऱ्याच दिवसांनंतर मृत्यूची संख्या ३ हजारांहून कमी होती. पण आज पुन्हा एकदा मृत्यूच्या संख्येत वाढ होऊन ३ हजारांहून अधिक जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात १ लाख ३२ हजार ७८८ नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ हजार २०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ३१ हजार ४५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ८३ लाख ७ हजार ८३२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ३५ हजार १०२ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ६१ लाख ७९ हजार ८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या देशभरात १७ लाख ९३ हजार ६४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २१ कोटी ८५ लाख ४६ हजार ६६७ जणांचो कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)ने दिलेल्या माहितीनुसार, देशात १ जूनर्यंत ३५ कोटी ५७ हजार ३३० नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात २० लाख १९ हजार ७७३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत.
देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात आता कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. मंगळवारी महाराष्ट्रात १४ हजार १२३ नवे कोरोनाबाधित आढळले. तर ८५४ जणांच्या मृत्यू नोंद झाली आणि ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या महाराष्ट्रात २ लाख ३० हजार ६८१ सक्रीय रुग्ण आहेत.