रत्नागिरीसह १४ जिल्हे आहेत रेड झोन मध्ये

मुंबई २४ मे – करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात 31 मे पर्यंत लाॅकडाऊन लागू आहे. मात्र सध्या राज्यातील करोना बाधितांच्या संख्येत घट होत असल्याने 1जूनपासून रेडझोनमधील 14 जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांत लाॅकडाऊन शिथील होण्याची शक्यता आहे.राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत हे संकेत दिले आहेत. राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.
रेड झोन मधील जिल्हे खालील प्रमाणे.
बुलढाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला,सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद हे 14 जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे 31 मे नंतर जरी राज्यातील लॉकडाऊनमध्ये शिथीलता मिळाली, तरी या जिल्ह्यांमध्ये शिथीलता येण्याची शक्यता कमी आहे. रेड झोनमधील जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आठवडाभर आढावा घेऊन जिल्हानिहाय त्याबाबत निर्णय घेतले जातील.रेड झोनमधील जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर कडक लॉकडाऊन कायम राहणार आहे, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.