पालघर दि.20 (जिमाका): तोक्ते चक्रीवादळामुळे मच्छीमारांच्या नौकेचे तसेच त्याच्या घरांचे नुकसान झालेले असून त्याच्या नौकाना नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे वस्त्रोद्योग, मत्सव्यवसाय, बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या गांवाची पाहणी मत्स व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजेद्र गावित, आमदार नाना पटोले व मच्छीमार व ग्रामस्थ् उपस्थित होते. पालघर तालुक्यातील मुरबे,टेंभो, उसाळी, भुडवळ,कोरे आदी गांवाना श्री शेख यांनी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. या चक्रीवादळाचा फटका मच्छिमांरांना बसला असून त्याच्या रोजगारावर परिणाम होऊ नये यासाठी नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. शेख यांनी सांगितले.