तीव्रता आणि गतीत वाढ झाल्यानंतर आज, १६ मे रोजी दुपारी पावणेतीन वाजता चक्रीवादळाचा मध्य रत्नागिरी व राजापूर पासून साधारण १०२ किलोमीटर अंतरावर समुद्रात आहे. पुढील दोन तासांत समुद्रकिनार्‍यालगतच्या गावात वाऱ्यांची तीव्रता जाणवणार आहे, असं रत्नागिरीच्या जिल्हा माहिती कार्यालयाने कळवलं आहे.