रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांचे आकडा पाचशेच्यावर जात आहे. आज शुक्रवारी (दि. १४) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत यापुर्वीचे १५७ आणि आज ३५५ असे मिळून ५१२ कोरोनाबाधित आढळले. यात रत्नागिरी तालुक्‍यातील सर्वाधिक १५० रुग्णांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासांत दहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ४३२ रूग्ण बरे झाले, अशी माहिती शुक्रवारी (दि. १४) जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️रत्नागिरी १५०
▪️दापोली ५०
▪️खेड ४६
▪️गुहागर ४
▪️चिपळूण ५९
▪️संगमेश्वर १७
▪️राजापूर १७
▪️लांजा ९
एकूण ३५५
यापुर्वीचे १५७