दापोली पोलीसांनी विविध ठिकाणी छापेमारी करून 16 अनधिकृत बंदुका ताब्यात घेत्यानं खळबळ माजली आहे. गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या या बंदूक तस्करांच्या मुसक्या आवळण्याचं काम दापोली पोलीसांनी केलं आहे.  या प्रकरणी 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दापोली पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार, शिवाजीनगर भौंजाळी येथील अमित मधूकर रहाटे (वय २८ रा. ) याने सिंगल नळीच्या १६ बंदूका विनापरवाना न्हानू पेंडूरकर (रा.पेंडूर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) याच्याकडून खरेदी केल्या होत्या. त्या बंदूका त्याने विविध भागातील व्यक्तींना विकल्या. याचा संपूर्ण छडाच दापोली पोलीसांनी लावला आहे.

या बंदूका त्याने समीर मोगरे (रा. पोयनार, ता.खेड) याला विकली होती. त्याने ती बंदूक गणेश चंद्रकांत चोरगे (रा. नवशी, तांबडवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) याला दोन वर्षापूर्वी विक्री केली होती. तसेच सौरभ राजेंद्र म्हसकर (रा. मौजे दापोली) याला २ सिंगल बॅरलच्या बंदूका विकलेल्या होत्या. तसेच अभिषेक सुधाकर जाधव (रा. जालगाव, श्रीरामनगर, दापोली) याला ३ सिंगल बोअर बंदूका काही महिन्यांपूर्वी विक्री केल्यानंतर त्याने १ सिंगल बोअर बंदूक सौरभ सुरेश धवाली (रा. जालगाव) याला शिकारीसाठी दिली. तर १ सिंगल बोअर बंदूक आकाश रेळेकर (रा. दापोली बाजारपेठ) याला विक्री केलेली आहे. तसेच समीर सत्यवान मोगरे (रा. पोयनार, ता. खेड) याला काही महिन्यांपूर्वी १ सिंगल बोअर बंदूक विक्री केली होती. ती त्याने गणेश चंद्रकांत चोरगे (रा. नवशी, ता. दापोली) याला शिकारीसाठी दिलेली होती व तो त्यासाठी वापरत होता. तसेच २ सिंगल बोअर बंदूका सुमीत बाळकृष्ण शिगवण (रा. मौजे दापोली) याला काही महिन्यांपूर्वी विक्री केल्या होत्या. त्यापैकी १ सिंगल बोअर बंदूक विनोद बैकर याला शिकारासाठी व १ सिंगल बोअरची १ बंदूक मनिष भोसले (रा. साकुर्डे) याला विकल्या होत्या. तसेच आकाश रेळेकर (रा. दापोली बाजारपेठ) व आशिष मोहिते (रा. जालगाव) याला प्रत्येकी १ सिंगल बोअर बंदूक विक्री केली होती. तसेच विजय नथुराम आंबेडे (रा. मौजे दापोली) याला १ सिंगल बोअर बंदूक विक्री केली होती. त्याचबरोबल अनंत धोडू मोहिते (रा. कोळबांद्रे) याला १ सिंगल बोअर बंदूक काही महिन्यापूर्वी विक्री केली, ती त्याने त्याचे ओळखीचा प्रशांत प्रकार पवार (रा. माथेगुजर) याला शिकरीकरीता दिली होती. तसेच राजाराम ऊर्फ राजू काशिराम भुवड, (रा. गिम्हवणे यास) एका सिंगल बोअर बंदूकीची विक्री केली आहे. त्यापैकी ४ बंदुका पुन्हा अमित मधुकर रहाटे (वय २८ रा. शिवाजीनगर भौजाळी, ता. दापोली) याचेकडे दिल्या होत्या. त्या त्याने आपले घरात मोडतोड करुन सुट्टे भाग करून लाकडी बट जाळुन पुरावा नष्ट केलेला असल्याने वरील आरोपीत यांनी एकमेकाचे संगनमताने व सहाय्याने सदरच्या बंदूका या गैरकायदा असल्याचे माहित असताना आपले जवळ बाळगले असल्याने पोलीसांनी गुन्हा दाखल केला.

गुन्ह्यातील आरोपी
१) अमित मधुकर रहाटे रा. भोगाळी दापोली
२) सौरभ राजेंद्र म्हद्रसकर रा. मौजे दापोली
३) अभिषेक सुधाकर जाधव राजालगाव
४) सौरभ सुरेश घवाळी रा.जालगाव लष्करवाडी
५) विजय नथुराम आंबेडे रा. मैजे दापोली
६) नरेश केशव साळवी रा. करंजाणी दापोली
७) विश्वास वसंत कानसे रा. मौजे दापोली
८) निलेश विलास काताळकर रा.खेडी दापोली
९) प्रशांत प्रकाश पवार रा. माथेगुजर १०) अनंत धोंडु मोहिते रा. कोळबांद्रे, दापोली यांना दापोली पोलीसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी छापेमारी करून सर्व बंदूका जप्त केल्या आहेत. त्याची सविस्तर माहिती आपण घेऊयात, गणेश चंद्रकांत चोरगे ( वय २९ वर्षे, रा. नवशी, तांबडवाडी, दापोली),  समिर सत्यवान मोगरे (रा. पोयनार ता. खेड), सुमित बाळकृष्ण शिगवण (रा. मौजे दापोली) यांंच्या ताब्यात  गैरकायदा बिगरपरवाना रु.२,५००/- किमतीची एक सिंगल नळीची बंदूक माळाली आहे. या बंदुकीची लांबी ४ फुट ३ इंच असून लोखंडी नळीची लांबी २ फुट ८ इंच, तिची गोलाई ४ इंच, बट जंगली लाकडाचा असून त्याची लांबी २ फुट ५ इंच असून बटाची रुंदी ११ इंच आहे. बंदुक नवशी तांबडवाडी ता. दापोली या ठिकाणी दिनांक १२/०५/२०२१ रोजी मिळुन आल्याने दापोली पोलीसांनी कारवाई केली आहे.  या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे तसेच पोहेकॉ/ २५३, कांबळे, पोहेकॉ/ ११८०, गुजर, पोहेकॉ / १९२, गुजर, पोकॉ/ ७९०, मोनये पोका / ९८२, सातार्डेकर पोकॉ/३४५,मोरे, मपोकॉ/६५८, ढोले, चापोकों/१६२, तळवटकर, चापोकों / १५१३ पाटील यांनी छापा घालून आरोपींना ताब्यात घेतलं. या गुन्हयाचा तपास पोउनि  निनाद कांबळे हे करीत आहेत.

तर गिम्हण्याहून राजाराम उर्फ राजू काशिराम भुवड (वय ४२ वर्षे, रा. गिम्हवणे, उगवतवाडी, ता.दापोली) याला गैरकायदा बिगरपरवाना रु. २,५००/- एक सिंगल नळीची बंदूकीसह ताब्यात घेण्यात आलं.  या बंदुकीची लांबी ४ फुट ३ इंच असून लोखंडी नळीची लांबी २ फुट ८ इंच, तिची गोलाई ४ इंच, बट जंगली लाकडाचा असून त्याची लांबी २ फुट ५ इंच असून बटाची रुंदी ११ इंच बंदुक दिनांक १२/०५/२०२१ रोजी गिम्हवणे उगवतवाडी या ठिकाणी मिळुन आल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक निनिद कांबळे आणि त्यांच्या टीमनं छापा टाकून कारवाई केली. प्रकरणाचा याचा तपास एम. एम. धोंडे हे करीत आहेत.

जालगाव येथील अमित अशोक अलम ( वय ३७ राजालगाव ब्राम्हणवाडी ता. दापोली) याच्या विरोधात दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने गैरकायदा बिगरपरवाना रु.२,५००/- एक सिंगल नळीची बंदूक तिची लांबी ४ फुट ३ इंच असून लोखंडी नळीची लांबी २ फुट ८ इंच, तिची गोलाई ४ इंच, बट जंगली लाकडाचा असून त्याची लांबी २ फुट ५ इंच असून बटाची रुंदी ११ इंच आह बंदुक आपले ताब्यात तेरेवायंगणी या ठिकाणी दिनांक १२/०५/२०२१ रोजी बाळगले होते.  पोलीसांनी छापा टाकून ती बंदुक जप्त केली. या गुन्ह्याचा तपास सपोनि सौ पुजा बक्षी या करीत आहेत.

जालगव येथील आशिष अनंत मोहिते (वय २५ वर्ष, रा. जालगाव, सुतारकोंड, ता. दापोली) याच्या विरोधात दाखल होऊन त्यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 5000 रूपये किंमतीची एक सिंगल नळीची बंदूक तिची लांबी ४ फुट असून लोखंडी नळीची लांबी २ फुट ९ इंच, तिची गोलाई ४ इंच, बट जंगली लाकडाचा असून त्याची लांबी २ फुट ४ इंच असून बटाची रुंदी १० इंच आहे वरील बाजूस घोडा व खालील बाजूस स्ट्रीगर आणि एक सिंगल नळीची बंदूक तिची लांबी ४ फुट १ इंच असून लोखंडी नळीची लांबी २ फुट ९ इंच, तिची गोलाई ४ इंच, बट जंगली लाकडाचा असून त्याची लांबी २ फुट ५ इंच असून बटाची रुंदी १ फुट आहे वरील बाजूस घोडा व खालील बाजूस स्ट्रीगर अशा एकूण दोन सिंगल बोअरच्या बंदुका शिवाजीनगर भोंजाळी या ठिकाणी दिनांक १२/०५/२०२१ आपले ताब्यात बाळगळे स्थितीत मिळुन आल्याने जप्त बंदुका व आरोपी यास ताब्यात घेणे कामी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि त्यांच्या टीमनं उत्तम कामगारी केली. याचा तपास सपोनि / पुज बक्षी या करीत आहेत.

भारतीय हत्यार अधिनियम कलम 3/25(3) अंतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणी आणखी कोणा कोणाचा हात आहे याचा पोलीस तपास करत आहेत.