रत्नागिरी दि. 13 -: समुद्रकिनाऱ्यालगत पाच किलोमीटरपर्यंत राहणार याबाबत संभाव्य चक्री वादळाचा इशारा देणारी दवंडी द्या व लोकांना याबाबत अवगत करा तसेच लक्षात घेऊन मागील निसर्ग चक्री वादळातील कामगिरी प्रमाणे विविध पथकांच्या माध्यमातून येणाऱ्या आपत्तीचा मुकाबला करण्यास तयार व्हावे असे निर्देश जिल्हा अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी आज एका बैठकीत दिले

अरबी समुद्रात लक्षद्विप जवळ सध्या चक्रीवादळ निर्माण होत असून याला तोक्ते असे नाव देण्यात आले आहे याच्या प्रवासात केरळ तामिळनाडू तसेच कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर वारे वाहणार आहेत तसेच पावसाची शक्यता आहे. यासोबतच वादळाची नेमकी दिशा कशी राहील हे अद्याप अनिश्चित आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणानी तयार राहावे असेही जिल्हाधिकारी म्हणाले. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व गोष्टींना त्वरित बंदरात आणण्याचे काम कोस्टगार्ड तसेच कस्टम्स आणि पोलीस दलाने करण्याचे निर्देश या बैठकीत त्यांनी दिले. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार आणि पोलीस यंत्रणेची बैठक दूर दृश्य प्रणालीद्वारे आज घेण्यात आली या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे तसेच आपत्ती व्यवस्थापन मुख्यकार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्‍हाधिकारी दत्‍ता भडकवाड यांची उपस्थिती होती.
या चक्रीवादळाची तीव्रता कमी असली तरी येणाऱ्या काळात त्याचे रूपांतर कसे होईल याबाबत निश्चित सांगणे अवघड आहे त्यामुळे याबाबतची पूर्वतयारी करून यात कमीत कमी नुकसान होईल यासाठी आतापासूनच कामाला लागण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले. हे चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात जवळून पंधरा ते सोळा या दोन तारखा दरम्यान सरकण्याची शक्यता आहे त्या दृष्टिकोनातून गावोगावी धान्यपुरवठा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर अत्यावश्यक सुविधा ज्यामध्ये औषधे तसेच दवाखान्या मधील सध्या दाखल रुग्णांची सुरक्षितता वीज पुरवठा आदी बाबींकडे सर्वांनी लक्ष द्यावे अशाही सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

हवामान खात्याचा ताजा अंदाज
दरम्यान हवामान खात्याने याबाबत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार या कालावधीत दक्षिण कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सद्यस्थिती नुसार हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या कराची जवळील समुद्रकिनाऱ्यावर जमिनी वर पोहोचेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.