दापोली:- १२ मे हा जागतिक परिचारीका दिन. वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारीकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. कोरोना संकटकाळात परिचारिका कोरोना वॉरियर्स बनून अहोरात्र रुग्णसेवा करत आहेत. या दिनाचे महत्व आज प्रकर्षाने आणि प्रभावीपणे कोव्हिड काळात जाणवते आहे. कोरोना काळात कोरोनाची लागण झाल्याची माहिती ही नातेवाईकांना कळते त्यावेळी रक्ताची नाती व परिचारिकांचे महत्त्व आताच्या कोविड काळात आणखी प्रखरपणे जाणवले. ज्यावेळी कोरोनाची लागण झाल्याची माहिती ही नातेवाईकांना कळते, त्यावेळी नातेवाईकांची इच्छा असूनही जवळ येऊ शकत नाही. अशावेळी डॉक्टरांची व्हिजिट झाल्यावर त्या रुग्णांची सर्वस्वी काळजी या परिचारिका म्हणजेच नर्स घेतात. परिचारीका हे आपले प्राण तळहातावर घेऊनच कोरोना रुग्णांची सेवा करतात. कधी संसर्ग होईल हे सांगत येत नाही; परंतु संसर्ग होईल या भीतीने त्यांनी कधीच रुग्णांना वाऱ्यावर सोडले असे कधीच घडले नाही. आज गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे आकडे हे सर्वसामान्यांची झोप उडवत आहेत. अशाही स्थितीत परिचारिका या मोठ्या हिमतीने रुग्णसेवेला प्राधान्य देतात. सरकारी रुग्णालयांप्रमाणेच खासगी रुग्णालयातही परिचारिकांचे कर्तव्याला शब्दच अपुरे पडतील. कोविड हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षभरात कोरोना रुग्णांची काळजी घेण्यासाठी सर्वच परिचारिका आपले कर्तव्य बजावत आहेत. आज उंबर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जागतिक परिचारीका दिन साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश तलाठी, रत्नागिरी जिल्हा परिषद संघटनेच्या उपसचिव सिंधु भाटकर, आरोग्य सहाय्यिका प्रमिला हुडबे, श्री. वाघमारे,श्री. ठाकरे, श्री. गोरीवले व सर्व परिचारीका यांनी परिचारीकेच्या जनक लेडी विथ द लॅम्प फ्लॅरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश तलाठी यांनी शितल होळकर, लालन पेटकर, पल्लवी आंबेडे, शर्मिला पवार, सुषमा क्षीरसागर, विजया वायंगणकर, पल्लवी रहाटे या परिचारीकांना पुष्पगुच्छ देऊन कोरोना लढ्यात लढण्याकरीता धैर्य दिले. कोरोना योद्धा परिचारीका व कर्मचारी यांनी आपले प्राण गमावून आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचे यावेळी स्मरण करुन त्यांचे बलिदान व्यर्थ जावु देणार नसुन कोरोना मुक्त भारत हेच आमचे स्वप्न आहे. यासाठी आम्ही अखेरच्या श्वासापर्यत लढा देऊ अशी भावनिक उद्गगार सिंधू भाटकर यांनी कार्यक्रमच्या वेळी व्यक्त केली. तसेच जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगांव यांच्यावतीने सर्व परिचारीका यांचा पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले