रत्नागिरी दि. 13:- माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 11 लाख 17 हजार 756 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले असून यातून 877 पॉझिटिव्ह
रुग्ण आढळले आहेत. यातील 307 जणांना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 770 पथकांनी तपास मी कामाला सुरुवात केली होती आता सध्या 870 पथके घरोघरी भेटी देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत. या अंतर्गत 3 लाख 16 हजार 705 घरांना भेटी देण्यात आल्या यातून एकूण 3 लाख 34 हजार 451 कुटुंबातील 11लाख 17 हजार 756 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या भेटीदरम्यान नागरिकांची ऑक्सीमीटरवर ऑक्सीजन पातळी तपासण्यासह त्यांच्या शरीराचे तापमान तपासणे तसेच सहा मिनिटांची वॉक टेस्ट घेणे आदी तपासण्यांचा समावेश आहे. या तपासणी दरम्यान 47745 घरे बंद असल्याचे आढळून आले आहे यांची पातळी चालण्याच्या तपासणीनंतर 95 पेक्षा खाली गेली अशांची एकूण संख्या 791 इतकी
आढळली आहे तर ताप सर्दी खोकला असणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या 1343 इतकी होती.