मुंबई पालिकेने मुंबईकरांच्या लसीकरणासाठी तब्बल एक कोटी डोस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. येत्या आठ दिवसांत यासाठी निविदा अंतिम करण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी ही माहिती दिली. दरम्यान, मुंबईत परदेशातून लस आली तर तीन आठवडय़ांत मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण करू, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले होते. शिवाय डोससाठी जागतिक निविदा काढाव्यात, अशा सूचनाही पालिका प्रशासनाला दिल्या होत्या.