महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः याबाबत सुतोवाच केलंय. लॉकडाऊन वाढवण्याबाबत मंत्रिमंडळ आग्रही आहे, मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं मत त्यांनी व्यक्त केलं. राजेश टोपे म्हणाले, “लॉकडाऊनबाबत अनेकांना अपेक्षा आहेत. मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत बोलून दाखवलं.कारण लॉकडाऊन केल्यानंतर कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. साधारणतः कोरोना रुग्णांच्या संख्येत 7 लाखांना पोहचलेला महाराष्ट्र आता 4 लाख 75 हजाराच्या दरम्यान आलाय. म्हणजे मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत घट झालीय.