रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आज घटली असून बरे झालेल्यांचे प्रमाणही वाढले आहे. आज सोमवारी (दि. १०) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत ३१० नवे कोरोनबाधित आढळले. यात रत्नागिरी तालुक्‍यातील सर्वाधिक १२० रुग्णांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासांत पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ६०१ रूग्ण बरे झाले,
तपशील पुढीलप्रमाणे
रत्नागिरी १२०
दापोली १४
खेड ११
गुहागर ६
चिपळूण ७६
संगमेश्वर ३०
राजापूर ४१
लांजा १२
एकूण ३१०