सरकारने सध्या करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेला लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला आहे. यासंदर्भात आदेश काढण्यात आला असून त्यानुसार आत्ता राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया दिली आहे.
टोपे म्हणाले, “राज्यात आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जनतेने यामध्ये खूप मोलाचं सहकार्य देऊन आपल्याला साखळी तोडण्यामध्ये सहकार्य करावं, हीच महत्वाची अपेक्षा आहे.”
