रत्नागिरी– रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत आहेत.त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांसाठी जिल्हा परिषद, रत्नागिरी येथे टेलिफोनिक ओपीडीची सुरुवात करण्यात आली आहे.
आपणास सर्दी,ताप,खोकला,डोकेदुखी आहे का ?,कोविड-१९ सारखी लक्षणे जाणवत आहेत का? ,कोविड झाला आहे असे वाटत आहे का?,डाॅक्टरांचा संपर्क होत नाही का?,कोविड-१९ विषयी आपल्याला काही शंका आहेत का? अशा आपल्या मनातील विविध प्रश्नांसाठी तसेच आपली कोविड १९ टेस्ट पाॅझिटिव्ह आली असेल आणि आपण होम आयसोलेशनमध्ये असाल तर संपर्क व सल्लामसलतीसाठी ओपीडी दूरध्वनी क्रमांक 02352- 225403,226403,227403 तसेच 8669187492,8668229856 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

भ्रमणध्वनी क्रमांकावर आपणास काॅल , व्हिडिओ, ईमेल ,वॉटस्अप संपर्क साधता येईल,हेल्पलाईनवर तज्ज्ञ डाॅक्टरची टीम तैनात करण्यात आली आहे.तरी आपल्या असलेल्या शंका ,समस्या यांचे निरसन करुन आपणास मार्गदर्शन केले जाईल
असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कळविले आहे.