रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. अशावेळी नागरिकांनी कोरोनाबाबतची माहिती, लसीकरण आणि शासकीय आणि खासगी रूग्णालयातील बेडची उपल्बधता याविषयीची माहिती मिळण्यासाठी covidratnagiri.org हे नवीन संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या प्रयत्नांने कोविड माहितीसाठी नवीन संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर जिल्ह्यातील कोविडचे बरे झालेले रूग्ण, मृत्यू याची माहिती, शासकीय आणि खासगी रूग्णालयातील बेड, ऑक्सिजन बेडची उपलब्धता, लसीकरण याविषयी माहिती उपल्बध होणार आहे.