कोरोना रुग्णसंख्यावाढीमुळे शासनाने दहावीच्या परीक्षाच रद्द केल्या आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी सायंकाळी घोषणा केली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील २१,७८७ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०,३५२ विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली असून, सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले आहेत.