रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्टची उभारणी करण्यात आली असून येत्या चार दिवसांत हा प्लँट सुरू होणार आहे या फ्लॅटमधून प्रतिदिनी साठ सिलिंडरचे निर्मिती होण्याची क्षमता आहे त्यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजनचा प्रश्न संपुष्टात येणार आहे सध्या रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर दोनशे सिलिंडरची प्रतिदिन आवश्यकता आहे त्यामुळे याठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यात तुटवडा भासणार नाही सध्या कोल्हापूर व रायगड येथून ऑक्सिजन सिलिंडर मागवण्यात येत आहेत तो पुरवठाही चालू ठेवण्यात येणार आहे.