रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयात दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडताच पोलीस अधीक्षक कार्यालय हादरून गेले. जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी शनिवारी तातडीने मुख्यालयातच ॲंटिजेन चाचणीसाठी यंत्रणा उभारली. शनिवारी ३७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, सर्व चाचणींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.