रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होत आहे. आज सगल दुसऱ्या दिवशी ५०० पेक्षा जास्त लोकांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. कोरोनाची हिच स्थिती राहिली तर परिस्थिती फार भयानक होऊ शकते. १ एप्रिल २०२१ रोजी ७८ रूग्ण आढळले होते आणि त्या सोळाव्या दिवशी म्हणजे १६ एप्रिल रोजी ५२२ रूग्ण आणि आज ५१५ पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे.
आजही अनेकांना कोरोना आहे यावर विश्वास बसत नाहीये. हट्ट् सोडून आता प्रशासनाला सहकार्य करणं आवश्यक आहे. कोरोना आता प्रत्येकाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपला आहे. कधीही काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. कृपया गरज असेल तर लोकांना घरा बाहेर पाडवं असं आवाहन प्रशासनातर्फे वारंवार केलं जात आहे. आता आपल्याला त्यांचं म्हणणं गंभीरपणे ऐकुन घेतल्याशिवाय पर्याय नाहीये.
मृत्यूचा आकडा वाढत आहे
जिल्हा प्रशासनानं पाठवलेल्या माहिती प्रमाणे आज एका दिवसात १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संगमेश्वर येथील अनुक्रमे ८३ वर्षीय पुरूष आणि ७८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. राजापूर येथील ८३ आणि ८० वर्षीय महिला दागवल्या आहेत. रत्नागिरीतील ७५ आणि ७४ वर्षी पुरूष मृत्यूमुखी पडले आहेत. खेड येथील ६८ आणि ५५ वर्षी पुरूष यांचा मृत्यू झाला आहे. गुहागर येथील ७४ वर्षी पुरूष आणि लांजा येथील २८ पुरूषाच्या मृत्यूची नोंदही झाली आहे. या सगळ्या बाबी प्रचंड वेदनादायी आहेत. खबरदारीच्या उपाययोजना अवलंबनं आता सर्वांत गरजेचं आहे.
एकट्या चिपळूण तालुक्यात १७९ रूग्ण
चिपळूणमध्ये तर परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. रूग्ण संख्या चिपळूणमध्ये झपाट्यानं वाढत आहे. तिथली आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर आलीये. आरटीपीसीआर चाचणीत १६७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर अँटीजेन टेस्टमध्ये १२ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. जिल्हा प्रशासनानं चिपळूणकडे प्रमुख्यानं लक्ष देणं आता निकडीचं आहे.
तालुकानिहाय कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची आकडेवारी खालील प्रमाणे
आरटीपीसीआर
रत्नागिरी – ३७
दापोली – ९
खेड – ५०
गुहागर – ११
चिपळूण – १६७
संगमेश्वर – ६
मंडणगड – ०
लांजा – ८
राजापूर – २०
एकूण – ३०८
अँटीजेन
रत्नागिरी – ७७
दापोली – ७
खेड – ३०
गुहागर – २५
चिपळूण – १२
संगमेश्वर – ३५
मंडणगड – २
लांजा – १२
राजापूर – ७
एकूण – २०७