रत्नागिरी : कोव्हीड19 रोगाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून दि १५ एप्रिल व १६ एप्रिल या दोन दिवसात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां विरोधात कारवाईचा बडगा उभारण्यात आला. यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्ह्यात ८३ ठिकाणी नाकाबंदी आयोजित करण्यात आली. यामध्ये एकूण ५००० वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण १०००० जणांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी केलेल्या ठिकाणी मोटार परिवहन कायदयाखाली एकूण १७७६ केसेस करण्यात आल्या. मोटार परिवहन कायद्याखाली केलेल्या केसेस मधून ४,९९,९०० इतका दंड प्राप्त करण्यत आला. मास्कचा वापर न करण्या-या २९६ इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यामधून १,५१,००० इतका दंड प्राप्त झाला आहे. एकूण ६ वाहने जप्त करण्यात आली. एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्या ५६० जणांची कोव्हीड चाचणी करण्यात आली, त्यापैकी ३१ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत