रत्नागिरी जिह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे यामुळे काेराेना रुग्णालये व सेंटरची जागा कमी पडत चालली आहे भविष्यात जिल्ह्यात रुग्ण वाढ होण्याच्या शक्यतेचा विचार करून जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी मोकळ्या मैदानावर पाचशे बेड जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली आहे लवकरच सेंटर उभारणीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे रत्नागिरीतील एका मोकळ्या मैदानात जंबो काेविड सेंटर उभारण्यात येणार असून पाचशे बेडचे हे सेंटर असेल परंतु सुरुवातीला शंभर ते दोनशे बेड सुरू केले जातील त्यानंतर रुग्ण स्थिती पाहून बेडच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून या सेंटरची उभारणी करण्यात येईल यासाठी मुख्यमंत्री नामदार उध्दव ठाकरे यांची मान्यता घेण्यात येईल.