चिपळूण : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अलीकडच्या काही दिवसांत ही संख्या दर दिवशी वाढत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले आहे. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या एक हजारच्या वर पोहोचली असून जिल्ह्यात फक्त ४४१ ऑक्सिजन बेड उपलब्ध असून ते सर्व फुल्ल झाल्याने कोरोना रुग्णांची हेळसांड होत आहे. यातही धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, मंडणगड, लांजा व राजापूर तालुक्यात एकही व्हेंटिलेटर बेड नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी बाहेर न्यावे लागत आहे.