दापोली : पंचायत समितीच्या सभापतीं विरोधात शिवसेनेनं आणलेला ठराव 9 विरूद्ध 3 मतांनी मंजूर झाल्यानं सभापती रऊफ हजवानी यांना पायऊतार व्हावं लागत आहे. या अविश्वास ठरावाच्या बाजूनं शिवसेनेच्या 3 आणि राषट्रवादीच्या 6 सदस्यांनी मतदान केलं.

ही प्रक्रिया पीठासीन अधिकारी आणि दापोलीचे प्रांत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सकाळी ११ वाजता झूमद्वारे ऑनलाईन सभा घेण्यात आली होती.

राष्ट्रवादीनं बॅकफूटवरून मारला षटकार

संजय कदम, माजी आमदार

राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली आहे अशी टीका करणाऱ्यांना हा मोठा धक्का आहे अशी प्रतिक्रिया देत बॅकफूटवरून राष्ट्रवादीनं मारलेला हा षटकार आहे, असं माजी आमदार संजय कदम माय कोकणशी बोलताना म्हणाले. ज्यांनी मुंबईत बोलावून रऊफ हजवानी यांच्या पत्नीचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला त्यांना देखील ही चपराक आहे, अशी टीकाही संजय कदम यांनी कोणाचंही नाव न घेता केली आहे.

अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणारे सदस्य

मनोज भांबीड (शिवसेना)
स्नेहा गोरिवले (शिवसेना)
अनन्या रेवाळे (शिवसेना)
राजेश गुजर (राष्ट्रवादी काँग्रेस)
चंद्रकांत बैकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
दिपक खळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
काळूराम वाघमारे (राष्ट्रवादी काँग्रेस)
योगिता बांद्रे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ममता शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)

आमदार योगेश कदम यांच्या प्रतिष्ठेला धक्का

आमदार योगेश कदम यांंनी पुढाकार घेऊन रऊफ हजवानी यांना शिवसेनेचा पाठिंबा मिळवून देत सभापतीपदावर कायम केलं होतं. आमदारांचा पाठिंबा रऊफ हजवानी यांना असताना देखील शिवसेनेच्या तीन सदस्यांनी त्यांच्या विरोधात जाऊन अविश्वास ठराव आणला. त्यामुळे दापोलीत उलटसुलट चर्चेला सुरूवात दबक्या आवाजात सुरू झाली आहे. दरम्यान या घटनेमुळे आ. योगेश कदम प्रचंड नाराज असल्यानं शिवसेनेच्या सदस्यांवर पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली आहे.

योगेश कदम, आमदार