मुंबई : पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी निधीची घोषणा केली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी अजून 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तिथून तो तत्काळ पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येईल, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली आहे. या निधीचा वापर करुन गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करण्यात यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.