कोरोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांची निर्यात थांबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. देशातील कोरोनाची स्थिती जोवर सुधारत नाही तोवर रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांची निर्यात बंद राहणार आहे, असं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक अनेक ठिकाणी रांगा लावताना दिसत होते. कोरोनाचे रूग्ण वाढत असताना, देशातील नागरिकांना इंजेक्शन मिळत नसताना निर्यात मात्र बंद करण्यात आलेली नव्हती. यामुळे जनतेमधून प्रचंड नाराजी उमटत होती.

लोकभावना लक्षात घेऊन अखेर सरकारनं रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आणली आहे.