दापोली:- दापोली केळशी येथे उटंबर – मुंबई गाडीला सकाळी अपघात होऊन या एसटी बसमधील सुमारे २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.यातील काही गंभीर आहेत असे सांगितले जात आहे. सगळ्या जखमी प्रवाशांवर केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेचे वृत्त कळताच दापोली एसटी डेपो व्यवस्थापक रेश्मा मधाळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवण्यासाठी बस रस्त्याच्या खाली घेतल्याचे वाहन चालकाचे म्हणणे आहे . परंतु या वाहन चालकाने मद्यपान केलं असल्याचा संशय व्यक्त प्रवाशांकडून होत आहे. या अपघाता नंतर ड्रायव्हर पळून गेला होता त्यामुळे संशय व्यक्त होत आहे.येथील लोकांनी त्याला केळशी रुग्णालयात आणल आहे. सदर वाहन चालकाने बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा आरोप लोकांनी केला आहे. तसंच अपघात झाल्याने ही बस केळशी येथे उभी करून ठेवण्यात आली आहे. असे असले तरी अपघाताचे नेमक अधिकृतपणे कारण समजू शकलेल नाही. केळशी गावानजीक ही बस रस्त्याच्या खाली गेली. प्रवाश्यांनी आरडाओरडा केल्यामुळे केळशी गावातल्या लोकांनी धाव घेतली आणि तात्काळ जखमींना केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. बस अजून थोड्या दूर गेली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. कारण पुढे एका बाजूला भारजा नदी आहे. त्या नदीत बस पलटी झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु सुदैवाने ही बस अलीकडेच रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. याप्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.