पारंपारिक रीतीरिवाजांना धक्का लागू नये म्हणून ना. उदय सामंतांनी दिल्या प्रशासनाला सूचना
रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधाने शिमगोत्सवाच्या आनंदावर विरजण पडतंय कि काय असे वाटत असतानाच एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. लोकांच्या भावना विचारात घेऊन यावर मार्ग काढण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मंत्री उदय सामंत यांनी एक बैठक बोलावली. या बैठकीला जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, उपविभागीय अधिकारी डॉ विकास सूर्यवंशी आदी उपस्थित होते. या बैठकीत ठरल्याप्रमाणे आता शिमगा उत्सवात २० जणांना पालखी घेऊन घरोघरी नेता येणार आहे. मात्र यासाठी २० जणांची परवानगी प्रांतांकडून घेणे बंधनकारक असणार आहे. पारंपारिक रीतीरीवाजाना धक्का लागू नये यासाठी लोकभावना विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.