दापोली:- राज्य शासनाच्या महाआवास अभियान- ग्रामीण पंचायत समिती दापोली आवारामध्ये डेमो हाऊसचा पायाभरणी कार्यक्रम दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. पंचायत समिती दापोली आवारामध्ये बांधणेत येणारे डेमो हाऊस प्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना नक्कीच मार्गदर्शक असे ठरतील असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाप्रसंगी सभापती रऊफ हजवानी, सभापती, आर.एम.दिघे, गटविकास अधिकारी,नगराध्यक्षा परवीन शेख, पं. स.सदस्य वृषाली सुर्वे, स्नेहा गोरीवले, सुवर्णा बागल, सहाय्यक गटविकास अधिकारी, मनिषा कदम प्रभारी उपअभियंता जि.प.बांधकाम तसेच पंचायत समिती दापोली कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने ग्राम विकास विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून दिनांक २० नोव्हेंवर, २०२० ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीत महाआवास अभियान-ग्रामीण राबविण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्याच्या ग्रामीण भागात बेघर लाभाध्य्यांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
राज्यात ग्रामीण भागातील भूमीहिन लाभाव्यांना घरकुल बांधणीसाटी जागा उपलब्ध करुन देणे, बहुमजली इमारत,डेमो हाऊसेस इत्यादी नाविन्यपूर्ण बाबींची या अभियान कालावधीत प्रभावी अंमलबजावणी करणेत येत आहे. सदर अभियानाच्या अनुषंगाने घरकुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी व लाभार्थ्यांना मार्गदर्शक ठरण्यासाठी पंचायत समिती आवारामध्ये डेमो हाऊसची निर्मिती करणेचे उद्दिष्ट निश्चित करणेंत आले आहे. त्याप्रमाणे हा पायाभरणी कार्यक्रम दापोली पंचायत समिती येथे घेऊन शुभारंभ करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी आर.एम.दिघे यांनी पंचायत समिती दापोली यांनी डेमो हाऊस या संकल्पनंविषयी विस्तृतपणे माहिती सांगितली.