मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच पुन्हा एकदा बुधवारी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल १३ हजार ६५९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ५४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.