▪️ राज्यातील विधानसभा व विधान परिषद सदस्यांना विकासकामांसाठी मिळणारा आमदार निधी एक कोटी रुपयांनी वाढवून 4 कोटी रुपये करण्याची करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली असून यासोबतच इतरही अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.

या आहेत घोषणा :

▪ पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यासाठी ते वस्तू व सेवा कराच्या कक्षेत आणण्याची गरज असून केंद्र सरकारने तसा प्रस्ताव आणल्यास महाराष्ट्र पाठिंबा देईल.

▪ मुंबईत गिरगाव चौपाटीजवळ मराठी भाषा भवन उभारण्याचे काम सुरू करणार. नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्याची प्रक्रिया याच वर्षी सुरू करणार.

▪संत रोहिदास महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, अहिल्यादेवी होळकर महामंडळ, महात्मा फुले महामंडळाला प्रत्येकी 100 कोटी रुपये.

▪सरसकट सर्व प्रकारच्या देशी मद्याावर उत्पादन शुल्काचा दर हा निर्मिती मूल्याच्या 220 टक्के किंवा 155 प्रति प्रूफ लिटर यापैकी जो जास्त तो कर लावण्यात येईल.

▪डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारकाच्या कामासाठी आवश्यक निधी देणार व स्मारकाचे काम 14 एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण होणार.

▪ठाण्यात ग्रामीण भागातील जनतेला उपयोगाचे ठरेल असे रुग्णालय उभारणार. त्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद