मुंबई- राज्यभरात आज तब्बल 11 हजार 141 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही वाढती रुग्णसंख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे तर राज्यात आज 38 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.36 टक्के एवढा आहे. राज्यात आज 6 हजार 13 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.17 टक्के एवढे आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 20 लाख 68 हजार 44 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.