मुंबई- आठवड्याभरापासून मुंबईसह राज्यात उष्णता वाढण्यास सुरुवात झाली आहे. आणखीन तापमानाचा पारा वर चढणार असल्यानं नागरिक पुरते हैराण होणार आहेत.गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ नोंदविण्यात आलं आहे. पुढील पाच दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.