दापोली- दापोली येथील श्रीम.सविता शांताराम जोंधळे, वय ५०, रा.पालगड पवारवाडी या दि.०५.०३.२०२१रोजी दुपारी १४.३० वा.चे सुमारास त्या काम करीत असलेल्या पालगड जोशी बंगला येथील बागेतील झाडांना पाणी घालत असताना एक अनोळखी मुलगा बंगल्याचे आवारामध्ये असलेल्या बोरींगची इलेक्ट्रीक वायर कट करीत असताना दिसून आल्याने त्यास त्यांनी काय करतोस असे विचारले असता मी रस्त्यावरअसलेल्या जीओ इंटरनेट पोलला अर्थिग देत आहे असे खोटे बोलून त्यांचेएकांताचा फायदा घेवून त्यांना मारहाण करून त्यांचे अंगावरील सोन्याची साखळी व कानातील(कुडी) झुमके असे एकूण १६.५ ग्रॅम वजनाचे वरुपये ४९,०००/- किंमतीचे सोन्याचे दागिने जबरस्तीने मारहाण करून चोरुन घेवून गेला म्हणून त्यांनी पोलीसठाण्यात तक्रार दिलेली होतीसदर गुन्ह्यातील घटनास्थळी श्री.राजेंद्र पाटील, सहा.पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ, पोहेकॉअशोक गायकवाड, पोहेकॉ दिपक गोरे, पोहेकॉ मोहन कांबळे, पोकॉ सागर कांबळे,पोकॉ/सुनिल पाटील, पोकॉ/ रमेश जड्यार, मपोकॉ/ निलम देशमुख यांनी भेट देवून फिर्यादी श्रीम.सविता जोंधळे यांचेकडे अधिक चौकशी करता सदर गुन्ह्यातील आरोपीत हा इलेक्ट्रीक केबल चोरीच्या उद्देशाने बंगल्यामध्ये आला परंतु फिर्यादी या बंगल्यामध्ये एकट्याच असल्याने व त्यांचे अंगावर सोन्याचे दागिने दिसल्याने आरोपीत याने त्याचा केबल चोरण्याचा इरादा बदलून त्याने फिर्यादी यांचे अंगावरील सोन्याचे दागिने चोरुन घेवून गेल्याची खात्री झाली. दापोली पोलीस ठाणे हद्दीमध्ये असे केबल चोरी किंवा इतर भुरट्या चोरी करणारे इसमांची माहिती घेवून त्यांचेकडे तपास करणेबाबत कयास करण्यात आला. सदर संशयित इसमाचा शोध घेणे कामी अशी दोन शोध पथक तयार करून आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केली. सदर इसमांचा पोलीस ठाणेहद्दीतील दापोली शहरामध्ये शोध घेवून काही इसमांकडे चौकशी केली असता ठोस धागेदोर मिळून येत नव्हते.संशयित पंधरा वर्षांचा मुलगा रा.दापोली मूळ रा.भरणे, ता.खेड हा दापोलीमध्ये पान टपरीवर मिळून आल्याने त्याचे कडे चौकशी करीता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्याने त्याचा संशय आल्याने त्यास लागलीच ताब्यात घेवून त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा त्यानेच केल्याचे कबूल केले, तसेच त्याचेकडे दागिन्याबाबत विचारणा केली असता सदरचे चोरून नेलेले सोन्याचे दागिने त्याचे खिशामध्ये असल्याचे सांगितल्याने त्याची अंग झडती घेतली असता सदर गुन्ह्यामध्ये वरील वर्णनाचे चोरलेले सोन्याचे दागिने मिळून आले. ते सर्व जप्त करण्यात आलेले असून संशयित इसम यासपुढील चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले.