मुंबई: राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना डॉक्टरांनी विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक मंत्री, आमदार आणि खासदारांना कोरोनाची लागण होत आहे. त्यातच आता आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.